File:देवळांचा धर्म आणि धर्माचे देवळे First page of the booklet.jpg

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

Original file(2,182 × 3,086 pixels, file size: 2.77 MB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

[edit]
Description
मराठी: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

कोणतीही वस्तु स्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेच पुष्कळांना मोठे कोडे पडते. पण ते उलगडणे फारसे कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार. कालचे मूल सदासर्वकाळ मूलच राहत नाही. निसर्गधर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्बाह्य स्वरूप एकसारखे वाढतच जाते आणि अवघ्या अठरा वर्षाच्या अवधीतच तेच गोजिरवाणे मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेत स्थित्यंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगडा धोंड्याप्रमाणे अचेतन अवस्थेत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांच काहीच चुकीने नाही. जेथे खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथे मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. जुने ते सोने ही म्हण भाषालंकारापुरती कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसाने नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधीच शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदल्यात थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही, तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत. निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही, पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येताच छाटायला मात्र ती विसरत नाही. प्रवीण वैद्यांची हेमगर्भ मात्रा एखाद्या वेळी एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील, पण निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षेवाचून सुटायचा नाही. पूर्वी कोणेकाळी मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणे, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखे आहे. अर्थात् कुचाळीचा परिणाम काय होणार, हे सांगणे नकोच. काळाच्या कुचाळ्या करण्यात हिंदू जनांनी दाखविलेल्या पराक्रम आज त्यांच्या सर्वांगीण अधः पापात स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदू समाज 'समाज' या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदूधर्म हे एक भले मोठे भटी गौडबंगाल आणि

हिंदू संस्कृती म्हणजे एक बिन बुडाचे पिचके गाडगे

यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही. उभ्या हिंदूस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसला नाही. यामुळे धर्म, संस्कृती, संघटन इत्यादि प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुप्फुसे अजून बरीच दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैताने सडून गेलेली स्वच्छ दिसते. तरी 'द्वैतातच अद्वैत आहे' म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काही कमी आढळत नाहीत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे. 'द्वैतांतच अद्वैत' अजमावण्याची भटी योगधारणा आमच्या सारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही, ती कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य अजमावण्यासाठी ज्यांचे पायच काही आम्हाला धरायला नको. सभोवर परिस्थितीचा जो नंगा नाच चालू आहे, आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानांत जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही. असे स्पष्ट नमून करायला या लेखणीस फार कष्ट होत आहेत. अशाही निराशाजनक अवस्थेत हिंदू समाज जगविण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचविणे हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. राजमार्गाच्या आमच्या सूचना इतर डळमळीत सुधारकांप्रमाणे मोहरी एवढी गोळी आणि बादलीभर पाणी अशा नाजूक होमिओपॅथिक मासल्याच्या केहाही नसणार. प्रबोधनाच्या सूचना म्हणजे थेट सर्जरीच्या (शस्त्रक्रियेच्या). पत्करल्या तर प्रयोग करून पहा.

पुस्तक यापुढे सुध्दा आहे अजून पूर्ण वाचण्यासाठी उपलब्ध गूगलवर सर्च कराल तर सहज मिळून जाईल.
Date
Source

ST Deokar

Dhyansagar Publications, Sanjay Gandhi Market, N-9, J 1/24, . T. V. Centre, HUDCO, Aurangabad - 431003, Maharashtra Md. 9975144805, 9545464340.
Author prabodhankar thakare

Licensing

[edit]
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current16:37, 19 April 2023Thumbnail for version as of 16:37, 19 April 20232,182 × 3,086 (2.77 MB)Prathmesh santosh ghule (talk | contribs)Uploaded a work by prabodhankar thakare from ST Deokar Dhyansagar Publications, Sanjay Gandhi Market, N-9, J 1/24, . T. V. Centre, HUDCO, Aurangabad - 431003, Maharashtra Md. 9975144805, 9545464340. with UploadWizard

There are no pages that use this file.

Metadata