File:CHARI SAMP.jpg

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

Original file(3,672 × 4,896 pixels, file size: 6.57 MB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

[edit]
Description
English: चरी संप स्मारकस्तंभ
Date
Source Own work
Author Sagarpatil600

Licensing

[edit]
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.


                                  चरी शेतकरी संप (जगातील पहिला ऐतिहासिक शेतकरी संप) (अलिबाग-रायगड)

  नमस्कार . आपण चरी या ऐतिहासिक गावाविषयी नवीन माहिती जाणून घेणार आहोत. चरी या गावाला फार मोठी 'ऐतिहासिक पार्श्वभूमी ' लाभलेली आहे. चरी या गावाला ऐतिहासिक म्हणण्यामागचे प्रयोजन असे की, या गावामध्ये शेतकऱ्यांचा पहिला ऐतिहासिक संप झाला.तर मग आपण चरी या गावाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. 
    
    देशातला शेतकऱ्यांचा पहिला संप हा रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील चरी या गावात झाला. २७ ऑक्टोंबर १९३३ मध्ये सुरू झालेला हा संप तब्बल सात वर्षे चालला होता. कोकणातल्या खोतीच्या पद्धतीने कष्टकरी शेतकरी गांजला  होता. कुळाने जमीन कसायची आणि त्यापैकी ७५ टक्के उत्पन्न खोताच्या घरी द्यायचं, अशी अनेक वर्षे ही अन्यायकारक पद्धत सुरू होती. रायगडमधील शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिला शेतकरी संप पुकारण्यात आला. ज्यावेळी संप पुकारण्यात आला, त्यावेळी लोकांची दयनीय अवस्था झाली होती. संप पुकारण्यात आल्यानंतर चरी ,रायंदे ,कोपरपाडा ,कोलटेंभी या गावातील जमिनी खार्‍या पाण्याने भिजून गेल्या होत्या. बांधबंदिस्ती करून या जमिनी पिकवण्याचा प्रयत्न केला.  
     शेतकऱ्यांचे आंदोलन टिकूच शकत नाही, उपासमार झाली की आपोआप शेती करण्यास सुरवात होईल, असं सावकारांना वाटत होतं. पण शेतकऱ्यांनी निर्धाराने लढण्यास सुरुवात केली. आंदोलन मोडून काढण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आणि चरीचा हा संप ऐतिहासिक ठरला. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साथ मिळाली. बाबासाहेब स्वतः चरीला आले आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या.  त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकर्‍यांच्या वतीने कोर्टात उभे राहिले. तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट घेऊन चर्चा केली. जगाच्या इतिहासामध्ये त्यावेळी तब्बल सात वर्षे चाललेला  एकमेव संप  १९३९ मध्ये मागे घेण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले.  त्याकाळी सात वर्षे काढलेल्या हालअपेष्टांमुळेमुळे आज चरीच्या गावकऱ्यांना अच्छे दिन आले असे म्हणायला काहीच हरकत नाही.  या लढ्यामुळे '"कसेल त्याची जमीन" हे धोरण अमलात आलं आणि "कुळकायदा" तयार करण्यात आला.'  
      
       शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ लढ्याचे स्मारक  चरी या गावात उभारण्यात आलेले आहे. या संपाची आठवण म्हणून शेतकऱ्यांचं अवजार असलेले टिकाऊ याचा वापर स्मारकस्तंभातील ज्योतीमध्ये केलेला आहे. असे अनेक टिकाऊ मिळून ही ज्योत तयार केलेले आहे. या स्मारकस्तंभाचे उद्घाटन  महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री. आर.आर. पाटील उर्फ आबा यांच्या हस्ते करण्यात आले. झुंजार नेते कैलासवासी नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावकारांच्या जुलूमशाही विरुद्ध चरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ असा सात वर्षे अभूतपूर्व संप केला. प्रामुख्याने या संपामुळे कुळकायदा निर्माण झाला आणि स्वातंत्र्यानंतर कसेल त्याची जमीन हे नैसर्गिक तत्त्व प्रस्थापित झाले. त्यामुळे खोत ,सावकार आणि जमीनदारांच्या गुलामगिरीतून समस्त शेतकरीवर्ग मुक्त झाला. या गौरवशाली संपातील लढवय्या शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी त्या संपाच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे स्मारक उभारले गेले आहे.


      ज्याप्रमाणे चरी संपाला ८६ वर्षे पूर्ण झाली असून त्याचप्रमाणे चरी गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला तब्बल शंभर नव्हे तर २०१९ यावर्षी एकशे दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत. चरी शाळेची स्थापना १६ ऑगस्ट १९०९ रोजी झाली. या शाळेने खूप मोठे विद्यार्थी घडवले आणि हे ज्ञान देण्याचे कार्य अजूनपर्यंत अविरतपणे चालू आहे.  चरी शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. असे चरी गावाला शेतकऱ्यांच्या  संपाबरोबर शाळेचाही प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. 
    चरी गावात आगरी समाज बहुसंख्य असून, कोळी ,बौद्ध ,न्हावी ,भोई  असे आणि इतर समाज सलोख्याने नांदत आहेत.  २७ नोव्हेंबर २०१९ रोजी चरी शेतकरी संपाचा ८६वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.  या सोहळ्याला पंचक्रोशीतील अनेक मंडळी उपस्थित होती.  
   चरी संपाच्या माध्यमातून कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत .त्यामध्ये शेतकर्‍यांकडे असलेली सहनशीलता, काहीही झाले तरी हार न मानण्याची वृत्ती, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी या गोष्टींचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची चांगलीच ससेहोलपट झाली .  
 नारायण नागू पाटील यांच्यावर विश्वास आणि प्रेमापोटी हजारो शेतकऱ्यांनी सलग सात वर्षे जमिनी कसल्या नाहीत हा विक्रमच होता.  पण आपले दुर्दैव असे कि या संपाला आपण विस्मृतीच्या गर्तेत टाकले आहे. जुन्या पिढीने हा इतिहास नव्या पिढीला सांगण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. चरी गाव ,ना. ना.  पाटील,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक शेतकरी यांच्यामुळेच कसेल त्याची जमीन हा कायदा अस्तित्वात आला आणि शेतकर्‍यांच्या खर्‍या अर्थाने उद्धार झाला. चरी गावाचा भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा आणि चरी गावाची या शेतकरी संपाच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे ,भारत नव्हे तर संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण व्हावी ,हीच सदिच्छा. 
                                                           "" शेतकरी सुखी तर जग सुखी.""
                                                                    "जय जवान, जय किसान."
 चरी संपाविषयी अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी  खालील दिलेल्या युट्युब लिंकला क्लीक करा.

https://www.youtube.com/watch?v=yfhhodiM4Fk&t=232s

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current08:12, 10 May 2020Thumbnail for version as of 08:12, 10 May 20203,672 × 4,896 (6.57 MB)Sagarpatil600 (talk | contribs)Cross-wiki upload from en.wikipedia.org

There are no pages that use this file.

Metadata